• English
  • मराठी

पनवेलसह रायगड जिल्ह्याला भेडसावणार्‍या रेल्वेच्या मूलभूत समस्या तातडीने सोडविल्या जाव्यात, अशी आग्रही मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील रायगड जिल्हा भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे नवी दिल्ली येथे केली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी रायगड भाजपच्या पदाधिकार्‍यांसह रेल्वेमंत्री श्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन रेल्वेसंदर्भातील समस्यांसंदर्भात चर्चा करून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. गोयल यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कोकण रेल्वेच्या दक्षिणेकडे जाणार्‍या लांबपल्ल्याच्या गाड्या पेण व रोहा रेल्वेस्थानकांमध्ये थांबाव्यात व तेेथे या सर्व गाड्यांना आरक्षण कोटासुद्घा उपलब्ध व्हावा, दिवा-रोहा रेल्वेला 12 डब्यांऐवजी 15 डबे असावेत व दिवा-रोहा रेल्वेची 1 फेरी वाढवावी, असे शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगितले. पेण रेल्वेस्थानकातून रिटर्न तिकीट मिळण्याची सोय उपलब्ध व्हावी, याकरिता तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केल्यावर रेल्वेमंत्री गोयल यांनी या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. रोहा रेल्वेस्थानकाबाहेर दोन्ही बाजूस रेल्वे फाटक आहे. हे बंद करून 50 टक्के राज्य सरकारचा सहभाग व 50 टक्के केंद्राचा सहभाग या तत्त्वावर दोन्ही रेल्वेवरील उड्डाणपूल बांधण्याकरिता राज्य सरकारने प्रस्ताव सादर करावा, असे मंत्री महोदयांनी सांगितले. रोहा रेल्वेस्थानकात सर्व रेल्वेगाड्या तांत्रिक पूर्ततेकरिता थांबतात. त्याऐवजी सर्व गाड्यांना रोहा हा अधिकृत थांबा घोषित व्हावा, याकरीता विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना शक्यता तपासणीच्या सूचना दिल्या आहेत, तसेच पनवेल स्टेशनवर अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जाव्यात, कोकण रेल्वे मार्गावर लांबपल्ल्यांच्या सर्वच रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, हार्बर लाईन्सवर जादा गाड्या सोडाव्यात आदी मागण्यांचाही यात समावेश करण्यात आलेला आहे. या समस्या सोडविण्यासाठी आपण आणि पनवेल प्रवासी संघाने सातत्याने पाठपुरावा करीत असतो, असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.