• English
  • मराठी

नेरूळ ते उरण रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील खारकोपरपर्यंतची बहुप्रतिक्षित अशी लोकल आता सुरू होणार आहे. मा. रेल्वेमंत्री श्री. पियुष गोयल हे दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

नेरूळ ते उरण रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील खारकोपरपर्यंतची बहुप्रतिक्षित अशी लोकल आता सुरू होणार आहे. मा. रेल्वेमंत्री श्री. पियुष गोयल हे दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या रेल्वेसेवेमुळे उलवे नोडमध्ये राहण्यास आलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नेरूळ ते खारकोपर मार्गावर पहिली ट्रेन ११ नोव्हेंबर रोजी धावणार असून, १२ तारखेपासून प्रवाशांच्या सेवेसाठी पहिल्या टप्प्यातील मार्ग खुला करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खारकोपर रेल्वेस्थानकात जाऊन पाहणी करण्यात आली.