• English
  • मराठी

पनवेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने विजयादशमी मेळाव्याचे आयोजन खांदेश्वर रेल्वे स्थानकानजीक सिडकोच्या मैदानात करण्यात आले होते.

पनवेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने विजयादशमी मेळाव्याचे आयोजन खांदेश्वर रेल्वे स्थानकानजीक सिडकोच्या मैदानात करण्यात आले होते. बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी संघाच्या विचारसरणीचा उहापोह आपल्या भाषणातून केला. भारताने गेल्या काही वर्षात सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक अशी केलेली प्रगती पाहता येत्या काळात आपला देश सार्‍या विश्वाचा मार्गदर्शक बनेल, असा विश्वास भय्याजी जोशी यांनी कळंबोली येथे व्यक्त केला.