• English
  • मराठी

1

ज्यांच्या थोर विचारांनि, शिकवणीने, संस्कारांनी आणि अलौकिक समाजकार्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील अनेकांना जीवन समृद्धीचा मार्ग दाखवला असे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, व थोर निरुपणकार तीर्थरूप पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची गुरुपौर्णिमेनिमित्त उरणचे आमदार श्री. महेश बालदी यांच्यासह रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले.