• English
  • मराठी

९ व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

[:en]9th Atal Karandak Ekankika Competition[:hi]९ व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न[:] 1

महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व एकांकिका स्पर्धांमध्ये कमी वेळात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ९ व्या ‘अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर पारितोषिक वितरण समारंभात पनवेल महापालिकेचे आयुक्त सन्मा. श्री. गणेशजी देशमुख यांच्या हस्ते विजेत्या एकांकिकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गेली 40 दशकांहून अधिक काळ रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ रंगकर्मी श्री. जयंतजी सावरकर यांचाही ‘गौरव रंगभूमीचा’ या विशेष पुरस्काराने याप्रसंगी सन्मान करण्यात आला. या पारितोषिक वितरण समारंभास राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सिने व नाट्यसृष्टीतील मान्यवर श्री. पुरुषोत्तम बेर्डे, श्री. अभिराम भडकमकर, श्री. विजय गोखले आणि श्री. पृथ्वीक प्रताप यांनी हजेरी लावली.