• English
  • मराठी

गतिमानता,गुणवत्ता आणि पारदर्शिता या त्रिसूत्रीवरच शहरांचा विकास शहरीकरण हा शाप नसून संधी समजा असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्मार्ट सिटी’ चा कार्यक्रम दिला आहे. सुलभ कर्ज योजना व सुलभ पॉलिसी धोरण जाहीर केले आहे त्यामुळे उरणकरांच्या हॉस्पिटलचा प्रश्न निकाली लागेल . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर रायगड जिल्ह्यात उरण येथे जाहीर प्रचार सभेला मार्गदर्शन केले . उरणचे रस्ते काँक्रिटीकरणासाठी ४४.५ कोटी रुपये दुसऱ्या कुणामुळेच दिलेले नसून आ. प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळेच मी दिले आहेत असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. मुंबईचा सेफ्टी झोनचा प्रश्न संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मार्गी लावला याचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी उरणच्या सेल्टी झोन प्रश्नाबाबत स्वतः संरक्षणमंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन जाईन असे वचनही त्यांनी दिले. देशात राज्यात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे विकासाचा राजमार्ग दिल्लीतून मुंबईत आणि मुंबईतून थेट उरणमध्ये येवू देत.येत्या काळात उरणला कोकणातील उत्तम शहर बनवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.