• English
  • मराठी

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर सेंटर फॉर स्कील डेव्हलपमेंट अर्थात कौशल्य विकास केंद्राच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर सेंटर फॉर स्कील डेव्हलपमेंट अर्थात कौशल्य विकास केंद्राच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. ‘निर्मीती २०१८’ अंतर्गत शनिवारी झालेल्या फॅशन शो चे उद्घाटन संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी वस्त्रप्रावरणांच्या कलाकृती सादर केल्या. पाश्चात्य संगीत, रंगीबिरंगी वेगवेगळ्या डिझाईन्सची वस्त्रप्रवारणे सादर करणार्‍या ललना आणि नेटक्या आयोजनात यंदाचा निर्मिती फॅशन शो जल्लोषात सादर करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.