• English
  • मराठी

खारघर भाजपच्या पाठपुराव्यामुळे ७४ क्रमांकाची एनएमएमटीची बस सेवा सुरु झाली आहे. या बस सेवेचा शुभारंभ प्रभाग समिती ‘अ’ चे अध्यक्ष अभिमन्यू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला

खारघर भाजपच्या पाठपुराव्यामुळे ७४ क्रमांकाची एनएमएमटीची बस सेवा सुरु झाली आहे. या बस सेवेचा शुभारंभ प्रभाग समिती ‘अ’ चे अध्यक्ष अभिमन्यू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. खारघरमधील नागरीकांची पनवेल प्रवास वाहतुकीसाठी होणारी गैरसोय दूरकरण्यासाठी भाजपा नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पनवेल महापलिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले होते. याचे गांर्भीय लक्षात घेऊन आयुक्तांनी नवी मुंबई परिवहन प्रशासनाशी संपर्क साधून बससेवा सुर करण्यात मदत केली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी व नोकरवर्गाची गैरसोय टळली आहे.