• English
  • मराठी

सिडको भवन येथे सिडकोचा ४९ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला.

सिडको भवन येथे सिडकोचा ४९ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. नगर नियोजन व विकासाची गौरवशाली परंपरा लाभलेले सिडको महामंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्यामुळे या समारंभास एक विशेष महत्व प्राप्त झाले होते. या प्रसंगी बहुसंख्य आजी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच या महत्त्वपूर्ण सोहळ्यास सिडकोचे माजी अधिकारी-कर्मचारी देखील आवर्जून उपस्थित होते.