• English
  • मराठी

दापोली विधानसभेचे मा. आमदार श्री. सूर्यकांतजी दळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश!

भारतीय जनता पक्षाची विचारधारा व कार्यपद्धत ही सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी मानून काम करणारी आहे, हा विश्वास जनमानसात दृढ होत आहे. याच विश्वासाचे प्रतिक म्हणजे दापोली विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार श्री. सूर्यकांतजी दळवी यांचा त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच जनविकासाची आस घेऊन मा. आमदार श्री. सूर्यकांतजी दळवी यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिकच बलाढ्य झाले आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासह अनेक मान्यवर या जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थित होते. मी देखील या पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहून पक्षप्रवेश केलेल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. पक्षप्रवेश केलेले सर्वच आपल्या कार्याने भारतीय जनता पक्षाला आणखी यशस्वी करतील, असा मला विश्वास आहे.