• English
  • मराठी

‘गाव चलो अभियान’ – पत्रकार परिषद

भारतीय जनता पार्टीतर्फे दि. ०४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येत आहे. यात भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार असून तेथील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या अभियानाच्या अनुषंगाने सरकारी योजनेतील लाभार्थी, बचत गट, धार्मिक स्थळांना भेट, नैपुण्य प्राप्त विद्यार्थी व खेळाडू, भाजप जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, समाज क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व अशा सर्वांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.
तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या १० वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे.
या अभियानाची माहिती देण्याच्या उद्देशाने नुकतीच शहरातील मार्केट यार्ड येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेतून पत्रकार बांधवांशी संवाद साधत अभियानाची रूपरेषा समजावून सांगितली. यावेळी माझ्यासमवेत भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री. विक्रांत पाटील, प्रदेश सदस्य मा.श्री. बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मा.श्री. अविनाश कोळी, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष मा.श्री. अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष मा.श्री. अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस मा.श्री. नितीन पाटील, श्री. दीपक बेहेरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.