• English
  • मराठी

शिक्षणाला अधिक महत्त्व देत त्याप्रती अमाप श्रद्धा असलेले रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते  रामशेठ ठाकूरयांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव’ या बहुमानाच्या पुरस्काराने सातारा येथे सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्या हस्ते हजारो रयत सेवकांच्या साक्षीने सन्मान करण्यात आला.

कर्तृत्व व दातृत्व आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक जबाबदारी व सामाजिक बांधिलकी जपणारे, शिक्षणाला अधिक महत्त्व देत त्याप्रती अमाप श्रद्धा असलेले रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते  रामशेठ ठाकूरयांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव‘ या बहुमानाच्या पुरस्काराने सातारा येथे सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्या हस्ते हजारो रयत सेवकांच्या साक्षीने सन्मान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे संस्थेचे माजी मानद सचिव पै. इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला यांच्या ४५व्या पुण्यतिथी सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांना या वर्षीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.