• English
  • मराठी

महापालिकेच्या स्थायी समितीची विशेष सभेत मालमत्ता करा संबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

महापालिकेच्या स्थायी समितीची विशेष सभेत मालमत्ता करा संबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मालमत्ता कराचा दर ३१ टक्के ठरवण्यात आला. नवी मुंबई, कल्याण, ठाणे महापालिकांच्या तुलनेत हा दर कमी आहे. प्रामाणिक कर दात्याला त्याने वेळेवर (तीन महिन्यात) कर भरल्यास २ टक्के सूट देण्यात येणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया घोषणेप्रमाणे जे करदाते ऑन लाईन कर भारतील त्यांना ही २ टक्के सूट दिली जाईल. याशिवाय ज्या सोसायट्या रेन हार्व्हेस्टिंग, सौऊर्जा हे प्रोजेक्ट राबवतील पण ते कार्यान्वित असतील तरच, कचर्‍याचे शास्त्रोक्त पध्दतीने विघटन करतील त्यांना २ टक्के सवलत दिली जाणार आहे. शौर्य पदक धारक सैनिक, अधिकारी किवा त्यांच्या विधवांना स्ववापरात असलेल्या मालमत्तांना करात सवलत देण्यात येणार आहे.