• English
  • मराठी

खारघरमध्ये भाजप साऊथ इंडियन सेलच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खारघरमध्ये भाजप साऊथ इंडियन सेलच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण तसेच महिलांचा सन्मान या वेळी करण्यात आला. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी, महिला आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच पनवेलमधील आगरी समाज सभागृहात संगीता नितीन जोशी सामाजिक विकास मंडळ आणि यशकल्प फाऊंडेशन यांच्या वतीने ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदर्श संस्था क्षेत्रात क्रांतिकारी सेवा संस्था तसेच सहा महिला बचत गटांतील महिलांचा सन्मान करण्यात आला.