• English
  • मराठी

खारघर मॅरेथॉन

आरोग्य आणि तंदुरुस्तीची समाजामध्ये जनजागृती व्हावी, या सामाजिक उद्देशाने यंदा रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर मॅरेथॉन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने खारघरमध्ये रविवारी ‘हम फिट तो इंडिया फिट’ या शिर्षकाखाली ही ११ वी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. झालेल्या ११ व्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांच्या खुल्या गटातील स्पर्धेत मुंबईच्या योगेंद्र कुमारने तर महिलांच्या खुल्या गटात पुण्याच्या जनाबाई हिरवे यांनी प्रथम क्रमांक पटकावित बाजी मारली. सुविधांची चोख सेवा, उत्कृष्ट व सुनियोजनात झालेल्या या मॅरॅथॉनमध्ये १६ हजारहून अधिक म्हणजेच अपेक्षा पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन तुफान प्रतिसाद देत ही खारघर महामॅरेथॉन सुपर हिट झाली.