• English
  • मराठी

‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी पनवेल मध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन

परीक्षेच्या अगोदरच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. 2018 पासून दरवर्षी पंतप्रधान महोदयांकडून हा अभिनव उपक्रम राबविला जातो. याच उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी, पनवेलच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरीता रामशेठ ठाकूर स्कूल कामोठे, सुधागड स्कूल कळंबोली आणि सी.के.टी. स्कूल नवीन पनवेल येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेमध्ये एकूण 4000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट चित्र रेखाटली. या स्पर्धेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले.