• English
  • मराठी

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यातआली.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यातआली. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आदींनी सहभाग घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.