• English
  • मराठी

महाराष्ट्रातील सर्व मतदार संघात CM चषकाचे आयोजन मोठया प्रमाणात करण्यात आले आहे. भव्य स्वरूपातील CM चषक २०१८ स्पर्धा कामोठ्यात सुद्धा संपन्न झाल्या.

महाराष्ट्रातील सर्व मतदार संघात CM चषकाचे आयोजन मोठया प्रमाणात करण्यात आले आहे. भव्य स्वरूपातील CM चषक २०१८ स्पर्धा कामोठ्यात सुद्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आले होते. यामध्ये सौभाग्य खो-खो, जलयुक्त शिवार हॉलीबॉल स्पर्धा आणि शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा, स्वच्छ भारत कुस्ती या स्पर्धा दोन दिवस सुरु होत्या. 
सी.एम.चषक या स्पर्धेमध्ये जलयुक्त शिवार हॉलीबॉल चषक २०१८ चे पहिले पारितोषिक पनवेलमधील व्हि.सी.पी.आर यास, सी.के.टी. कॉलेजने द्वितीय क्रमांक, नाईक इलेव्हन टेन स्पोर्ट्स क्लबने तृतीय क्रमांक संपादन केले. तसेच महिला गटांमध्ये प्रथम क्रमांक बालभारती पब्लिक स्कूल, द्वितीय सी.के.टी. कॉलेज, तर स्पार्टेन स्पोर्टस क्लब यांनी तृतीय क्रमांक पटकावला. खो-खो स्पर्धेत पुरूष गटांमधून प्रथम क्रमांक कळंबोलीमधील नवयुवक क्रिडा संस्था, द्वीतीय क्रमांक फिनिक्स स्पोर्ट असोसिएशन, तर तृतीय क्रमांकही फिनिक्स स्पोर्ट असोसिएशन यांनी पटकावले असून, महिला गटांमधून प्रथम क्रमांक फिनिक्स स्पोर्ट असोसिएशन, द्वितीय वायुदूत क्रिडा केंद्र आणि तृतीय क्रमांक नवयुवक क्रिडा संस्था यांनी पटकावला. या विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीसवितरण करण्यात आले. यावेळी मान्यवर आणि खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.
सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन..!