• English
  • मराठी

“भारती विद्यापीठ आणि मल्टीकव्हर हॉस्पिटल”च्या संयुक्त विद्यमाने खारघर येथील भव्य इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न

भारतातील आघाडीची बहुराष्ट्रीय रुग्णालय साखळी असणाऱ्या “भारती विद्यापीठ मल्टीकव्हर हॉस्पिटल”च्या खारघर सेक्टर 10 येथील नव्या व भव्य इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या नव्या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या शुभ प्रसंगी राजकीय, सामाजिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह मी देखील तेथे उपस्थित होतो. यावेळी भारतीय विद्यापीठ मल्टीकव्हर हॉस्पिटलच्या प्रमुखांना तसेच हॉस्पिटल व्यवस्थापक, सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. या सर्व अद्यावत व सर्व आधुनिक वैद्यकीय सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा रुग्णालयामुळे खारघर तसेच नवी मुंबई व पनवेलकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधा तात्काळ व योग्य दरात उपलब्ध होणार असल्याचा आनंद आहे.