• English
  • मराठी

कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुक २०२३ : महायुतीचे उमेदवार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या प्रचारार्थ पनवेल मध्ये शिक्षक स्नेह मेळाव्याचे आयोजन !

[:en]Election of Konkan Teachers Constituency 2023 !![:hi]कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुक २०२३ : महायुतीचे उमेदवार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या प्रचारार्थ पनवेल मध्ये शिक्षक स्नेह मेळाव्याचे आयोजन ![:] » आमदार प्रशांत ठाकूर

मान्यवरांच्या उपस्थितीत पनवेल मधील शिक्षकांनी केला ज्ञानेश्वर सरांच्या विजयाचा निर्धार
कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुक २०२३ भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांची शिवसेना-रिपाई (अ) व इतर मित्र पक्षाचे लोकप्रिय उमेदवार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या प्रचारार्थ वीरूपक्ष मंगल कार्यालय, पनवेल येथे शिक्षक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब, राज्याचे शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दिपकजी केसरकर साहेब, मा. खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिक्षकांना श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना येणाऱ्या ३० जानेवारी रोजी प्रचंड मतांनी विजय करण्यासाठी आवाहन केले. यावेळी आमदार श्री. महेशजी बालदी साहेब, आमदार श्री. महेंद्रजी थोरवे , आपले उमेदवार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर, पक्षाचे वरिष्ठ नेते, मोठ्या संख्येने शिक्षक व भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांची शिवसेना-रिपाई व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.