• English
  • मराठी

खारघर महामॅरेथॉन सुपर हिट झाली.

[:en]Kharghar marathon become superhit due to its best facilities[:hi]खारघर महामॅरेथॉन सुपर हिट झाली.[:] » आमदार प्रशांत ठाकूर

व्यसनमुक्तीचा संदेश देत हजारो नागरिकांनी घेतला सहभाग

रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्यावतीने ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हा समाजहिताचा संदेश घेऊन खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या “खारघर मॅरेथॉन 2023” ला खारघरसह, पनवेल व नवी मुंबईतील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मॅरेथॉन मध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत तसेच तरुण-तरुणी, विद्यार्थी सेवाभावी संस्था, खेळाडू या सर्वांनीच स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संदेश दिला. सुविधांची चोख सेवा, उत्कृष्ट व सुनियोजनात झालेल्या या मॅरॅथॉनमध्ये अपेक्षा पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन तुफान प्रतिसाद देत ही खारघर महामॅरेथॉन सुपर हिट झाली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही खारघर मॅरेथॉन ला उदंड प्रतिसाद देऊन ही मॅरेथॉन यशस्वी केल्याबद्दल मी या मॅरेथॉनमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांचे तसेच आयोजकांचे व आयोजनात हातभार लावलेल्या प्रत्येकाचेच मनःपूर्वक आभार मानतो.