• English
  • मराठी

नमो चषक २०२४ : पारितोषिक वितरण समारंभ

“घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा” म्हणत भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील उदयोन्मुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात “नमो चषक २०२४” चे भव्य आयोजन करण्यात आले होते. आपल्या पनवेल विधानसभा मतदारसंघातही स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा दिमाखदार महोत्सव साजरा झाला. कुस्ती, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, रस्सीखेच, ज्युडो अशा क्रीडा स्पर्धांचा तसेच नृत्य, चित्रकला, रांगोळी, गीत गायन अशा कला स्पर्धांचा या महोत्सवात समावेश होता.
विशेष म्हणजे, पनवेल विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या नमो चषक २०२४ स्पर्धेत १,१३,२७८ स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धक नोंदणीमध्ये महाराष्ट्रात ४था क्रमांक पटकावला.
याच “नमो चषक २०२४” चा पारितोषिक वितरण समारंभ आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे सुरू सध्या सुरू आहे. उत्तर रायगड मधील भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच क्रीडा क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्ती, सोशल मीडियावरील नामवंत इन्फ्ल्यूएन्सरस व अनेक क्रीडारसिक या समारंभासाठी उपस्थित आहेत.