• English
  • मराठी

इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन यांच्या तर्फे आज वाजे हायस्कुल व ज्युनियर कॉलेज वाजे येथे ‘हॅपी स्कुल’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन यांच्या तर्फे आज वाजे हायस्कुल व ज्युनियर कॉलेज वाजे येथे ‘हॅपी स्कुल’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याचसोबत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना शैक्षणिक वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.
दरम्यान इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन यांच्या माध्यमातून या शाळेला टेबल, खुर्च्या, ७० बॅगस्, सिलिंग फॅन, ट्यूब लाईट यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माझ्यासमवेत इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षा सई पालवनकर, सेक्रेटरी डॉ. राजेश्री बागडे, डॉ.शोभना पालेकर, श्री सुधीरजी कांडपिळे, व्हॉइस डिस्ट्रीट चेअरमन चारूशिलाताई घरत, डॉ. साधना गांधी, डॉ. जय भंडारकर, वाजे गावचे सरपंच, उपस्थित होते.