• English
  • मराठी

पनवेलच्या रंगनील व पनवेल मीडिया प्रेस क्लब यांच्यातर्फे कै. प्रदीप बेलापूरकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या स्थानिक कलाकारांच्या हिंदी-मराठी गाण्याचा ‘रंगनील संध्या’ कार्यक्रम थाटामाटात पार पडला.

पनवेलच्या रंगनील व पनवेल मीडिया प्रेस क्लब यांच्यातर्फे कै. प्रदीप बेलापूरकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या स्थानिक कलाकारांच्या हिंदी-मराठी गाण्याचा ‘रंगनील संध्या’ कार्यक्रम थाटामाटात पार पडला. या रंगनील संध्येत डॉ. निखिल मनोहर, मकरंद बाळ, प्रतीक जेऊरगी, राजेंद्र मानकामे, तृप्ती मानकामे, संविधा पाटकर, वर्षा जोशी, निलांबरी अनगळ, स्नेहा राजे, धनश्री बांठिया, डॉ. वीणा मनोहर, संजय गोडसे यांनीहिंदी-मराठी गाणी गायली तसेच रिधीका बांठिया, रिशिका बांठिया, निधी दलाल, मयुरी वाघमारे यांनी नृत्य सादर केले. या कार्यक्रमात सिंथेसायझर विजय मनोहर, हार्मोनियम महेश घाटे, ऑक्टोपॅड प्रवीण भोपी, तबला अमोल खासनीस, ढोलकी-तबला माधव भागवत, तर सतीश बेलापूरकर यांनी विविध तालवाद्य वाजवून कार्यक्रमाला रंगत आणली. सर्व गायक व वादकांचे कौतुक..!